AurangabadCrimeUpdate : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी कडून तलवार जप्त

औरंगाबाद : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी तलवार घेऊन फिरतांना अटक केली. सूर्यकांत गिताराम शिंगाडे (३०) नागसेननगर उस्मानपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. आज दुपारी १२च्या सुमारास प्रतापनगर ग्राऊंडवर आरोपी शिंगाडे तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली गस्तीवरील पथकाने त्वरीत तेथे जाऊन शिंगाडे ला ताब्यात घेत त्याच्या जवळील अंदाजे ९०० रु.कि.तलवार जप्त करत अटक केली. पोलिस कर्मचारी संदीपान धर्मे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वाघ करंत आहेत.