MumbaiNewsUpdate : अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी दाखवला हिसका , आजची रात्र जाणार पोलीस ठाण्यात…

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेला राणा दाम्पत्याचा हाय होल्टेज ड्रामा मुंबई पोलिसांना या दाम्पत्याला अटक करून तूर्त संपवला असला तरी यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरु केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धारावर आलेल्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेतली तरी त्यांच्या माफी मागण्यांवर शिवसैनिक ठाम असल्याने राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे राणा दाम्पत्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल करीत अटक केली आहे.
विशेष म्हणजे खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी दुपारीच आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मुंबईत पोलीस विनंती करण्यासाठी राणा यांच्या घरी गेले. मात्र, नवनीत राणा यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पोलीस आपल्याला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आले आहे, असा दावा केला आहे.
Amravati MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana arrested under section 153A by Khar Police: Mumbai Police pic.twitter.com/Pkw4TAB8Tl
— ANI (@ANI) April 23, 2022
दरम्यान ‘आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आम्हाला कोणतेही वॉरंट न दाखवता घेऊन जात आहे. जर आम्हाला अटक केली तर आम्ही जामीन घेणार नाही, असा निर्धारकरताना राणा यांनी या व्हिडीओतून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना सुद्धा मदतीसाठी आवाहन केले आहे. आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा पठण करण्याची मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. राज्यावर आलेलं संकट, शेतकऱ्यांवर आलेलं संकट, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर अनेक संकट आली आहेत तेव्हा पासून राज्यातील जनता त्रस्त आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा आमट्या ह्रदयात आहेत. मातोश्री आमच्या ह्रदयात आहे. मी कुठलेही चुकीचे भाष्य केले नाही अशी नरमाईची भाषा करण्याचा प्रयत्न केला.
आजची रात्र पोलीस ठाण्यात
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.अटक करण्यात आल्यानंतर आता आज किंवा उद्या न्यायालयात हजर करण्या अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्यने गर्दी केली आहे. दरम्यान राणा दाम्पत्यानेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे वृत्त आहे.