GunratnaSadavarteNewsUpdate : गिरगाव कोर्टाकडून ११५ एसटी कर्मचाऱ्यांसहित गुणरत्न सदावर्ते यांनाही जामीन

मुंबई : सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अखेर जामीन मिळाला आहे. सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तर सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्यासहित अटक करण्यात आलेल्या ११५ एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान सदावर्ते सध्या कोल्हापूर येथे पाच दिवसांची पोलीस कोठडीत आहेत. मुंबई न्यायालयाच्या आधी सातारा कोर्टानेही त्यांना जामीन दिला आहे. सोलापूर , पुणे अकोल्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांकडून सुटका होताच त्यांना इतर जिल्ह्याचे पोलीस ताब्यात घेण्यासाठी अर्ज देत आहेत त्यामुळे त्यांच्यामागे हा अटकेचा फेरा किती दिवस राहील हे सांगणे अनिश्चित आहेत.