MaharashtraPoliticalUpdate : ‘अर्धवटराव’ म्हणून धंनजय मुंडे यांनी कोणाची उडवली टर … ?

सांगली : दोन दिवसांपूर्वीच त्यंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच ‘राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अर्धवटराव म्हणून चांगलीच टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला. आजच्या याच सभेत बोलत असताना धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीच्या रजेवर होते मात्र दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बाहेर येताच भाजपवर तोफ डागली आहे. इस्लामपूर येथे बोलताना मुंडे म्हणाले कि , पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवट राव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले. त्यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा होत आहे.