Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharashtraWeatherUpdate : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Spread the love

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात  आली आहे. त्याचवेळी गारपिटीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. दिवसेंदिवस हवामानात बदल होत असून  राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत .

महाराष्ट्रात २१ आणि २२ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  महाराष्ट्र, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, हिमालाय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होईल. त्याचवेळी विजांचा कडकडाट होईल. त्याचवेळी गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान जोरदार पडणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!