MumbaiNewsUpdate : किरीट सोमय्या यांनी मानले मुंबई हायकोर्टाचे आभार

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की 18 ते 22 एप्रिलपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेसमोर जा आणि तपासात सहकार्य करा. पोलिसांनी अटक केल्यास तात्काळ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. सोमय्या यांच्यावर 2014 मध्ये बंद करण्यात INS विक्रांत प्रकरणात गोळा केलेल्या 57 कोटी रुपयांच्या रकमेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात आश्रय घेतला होता. सोमय्या यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दावा केला होता की, सत्र न्यायालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात त्रुटी आहे. दरम्यान दोन्हीही बाजू ऐकून मुंबई हायकोर्टाने सोमय्या यांना हा दिलासा दिला. याबद्दल सोमय्या यांनी ट्विट करीत मुंबई हाय कोर्टाचे आभार मानले असून घोटाळेबाज महाराष्ट्र सरकारविरोधातील आपली लढाई चालूच राहील असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I thank Mumbai High Court for granting Interim Relief/Bail.
Thackeray Sarkar not produced a single document of ₹57 Crore Vikrant Scam. They are exposed
Our fight against the "Ghotalebaj" Maharashtra Govt will continue till the Dirty Dozen of Thackeray Sarkar gets punishment
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 13, 2022