MaharashtraPoliticalUpdate : प्रकाश आंबेडकर म्हणतात , काँग्रेस असो कि शिवसेना आम्ही लग्नाला तयार … !!

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. काँग्रेसलाही प्रस्ताव देण्यासंबंधी विचारले असता त्यांनी माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही फक्त म्हणतात आमच्यासोबत फिरा असे विनोदाने म्हटले आहे. “याअगोदरही प्रस्वात देण्यात आले आहेत. आम्ही शिवसेनेची, काँग्रेसची दोघांची वाट पाहतोय,” असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले . महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा बोलावलेही होते असा खुलासा यावेळी त्यांनी केला आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही फक्त म्हणतात आमच्यासोबत फिरा- प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar @VBAforIndia @ShivSena @OfficeofUT @INCIndia pic.twitter.com/FwsPmDvM15
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) April 13, 2022
“शिवेसेनसोबत आमची युती होऊ शकते. आता करायची की नाही हे शिवसेनेने ठरवावं,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर त्यांना हा शिवसेनेसाठी प्रस्ताव समजावा का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मी तुम्हाला आणखी थोडी माहिती देतो. उद्धव ठाकरे यांनी मला एकदा बोलावलं होतं, पण त्यांची यावर बोलण्याची हिंमत झाली नाही”. दरम्यान काँग्रेसलाही प्रस्ताव देण्यासंबंधी विचारलं असता त्यांनी माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही फक्त म्हणतात आमच्यासोबत फिरा असं मिश्कीलपणे म्हटलं. “याअगोदरही प्रस्वात देण्यात आले आहेत. आम्ही शिवसेनेची, काँग्रेसची दोघांची वाट पाहतोय,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरेंशी माझी चांगली ओळख आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो, बाळासाहेबांशीही माझे चांगले संबंध होते. पण आता लग्न करायचं की नाही हे आता त्यांनी ठरवावं. त्यांना फक्त मैत्रीच हवी आहे, त्याच्या पुढे जाण्यास तयार नाही,” असंही ते म्हणाले.