MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक’ हल्ला प्रकरणी विरोधक -सत्ताधाऱ्यात वाद , सैरभर आंदोलक

मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. जवळपास १५० ते २०० कर्मचारी पवारांच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आंदोलकांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर आता आंदोलक आणि सरकार, पोलीस असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी मध्यरात्री जबरदस्तीने आझाद मैदानातील आंदोलकांना तेथून हाकलून लावले. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांना संताप व्यक्त केला आहे. या कारवाईदरम्यान, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश लोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून ते कोल्हापूर कागल आगारातील कर्मचारी आहेत.
शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच, पोलिसांनी१०९आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुणरत्न सदावर्तेंनाही अटक केली आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महेश लोले नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे त्यांचा बीपी वाढला होता, या अस्वस्थेतूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आंदोलक म्हणाले कि , पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात आम्हाला मध्यरात्री आझाद मैदानातून हुसकावून लावलं. आम्हाला सीएसएमटी स्थानकात सोडण्यात आले पोलिसी कारवाईदरम्यान अनेक कर्मचारी जखमी झाले. तर काही कर्मचारी गायब झाले. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यांना फोनही लागत नाहीत. आमचे सहकारी कुठे गेले, त्यांना कुठे ठेवण्यात आलं आहे, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. आमचे सहकारी परत येत नाहीत, तोपर्यंत आम्ही सीएसएमटी सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
आणि आंदोलक सदावर्ते यांच्या निरोपाची वाट पाहत होते…
आम्ही गेल्या ५ महिन्यांपासून आझाद मैदानात शांततेत आंदोलन करत होतो. मात्र आता आम्हाला अचानक तिथून हाकलवून लावण्यात आले. आझाद मैदानात वीज, पाण्याची सुविधा नाही. कडक पोलीस बंदोबस्तात आम्हाला सीएसएमटी स्थानकात आणण्यात आलं. एक तर पोलिसांनी आम्हाला पुन्हा आझाद मैदानात सोडावं, अन्यथा आम्ही सीएसएमटी स्थानकातच ठिय्या देऊ, असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. आमचे काही सहकारी गायब झालेत. ते कुठे आहेत याचं उत्तर आम्हाला मिळायला हवं, असं कर्मचारी म्हणाले. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे.