MaharashtraNewsUpdate : मराठवाड्याचा युवा कार्यकर्ता कृष्णा तवले झाला युवक कॉंग्रेसचा गोव्याचा प्रभारी

उस्मानाबाद : भारतीय युवक कॉंग्रेसने देशातील युवकांना राजकीय प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी “यंग इंडिया के बोल” हा कार्यक्रम नव्याने लॅांच केला आहे. या कार्यक्रमासाठी गोवा राज्याच्या प्रभारीपदी कृष्णा तवले यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रसरकारविषयी असणारा आक्रोश वक्तृत्वातून मांडणाऱ्या युवकांना प्रवक्तेपदाची संधी देण्यात येणार आहे. या निवडीसाठी कृष्णा यांनी भारतीय युवक कॅांग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू,राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी तसेच पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.