UttarPradeshNewsUpdate : योगींच्या मंत्रिमंडळात सोशल इंजिनीयरींचे पूर्ण पालन , बघा पूर्ण मंत्रिमंडळ…

लखनौ : योगी आदित्यनाथ यांनी आज दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय एकना क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजपशासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळात सोशल इंजिनियरिंच्या सूत्रांचे पालन करण्यात आले असून यामध्ये ब्राहमणांसह ठाकूर, ओबीसी आणि मागासवर्गीयांना तर एका जागेवर अल्पसंख्यांक आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यासह केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी यूपीच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह यांच्यासह १६ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये बेबी राणी मौर्या, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंग, धरमपाल सिंग, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंग चौधरी, अनिल राजभर, जितीन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशिष पटेल आणि संजय निषाद आदींचा समावेश आहे.
यानंतर नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रवींद्र जैस्वाल, संदीप सिंग, गुलाब देवी, गिरिचंद्र यादव, धरमवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंग, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंग, अरुणकुमार सक्सेना आणि दयाशंकर मिश्रा यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली तर मयंकेश्वर सिंग, दिनेश खाटिक, संजीव गोंड, बलदेव सिंग ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, ब्रिजेश सिंग, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान वाल्मिकी, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर गुरु, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी आणि विजय लक्ष्मी गौतम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निरीक्षक म्हणून आलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. हा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.
तब्बल ३७ वर्षानंतर…
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला २५५ जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला १२ आणि निषाद पक्षाला ६ जागा मिळाल्या. हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. उत्तर प्रदेशात ३७ वर्षांपूर्वी, १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले करून तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तर आज योगी आदित्यनाथ यांच्या खात्यात तब्बल ३७ वर्षांनंतर हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
योगींच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी
मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ
केशव प्रसाद मौर्य – उपमुख्यमंत्री
ब्रजेश पाठक – उपमुख्यमंत्री
कॅबिनेट मंत्री :
सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंग, बेबी राणी मौर्या, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंग, धरमपाल सिंग, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्र सिंग चौधरी, अनिल राजभर, जितीन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, कुमार शर्मा आशिष पटेल, संजय निषाद
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) :
नितीन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रवींद्र जैस्वाल, संदीप सिंग, गुलाब देवी, गिरिचंद्र यादव, धरमवीर प्रजापती, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंग, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंग, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्रा दयालु.
राज्यमंत्री :
मयंकेश्वर सिंग, दिनेश खाटीक, संजीव गोंड, बलदेव सिंग ओलख, अजित पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, ब्रिजेश सिंग, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान वाल्मिकी, प्रतिभा शुक्ल, प्रतिभा शुक्ल. राठौर गुरु, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आझाद अन्सारी, विजय लक्ष्मी गौतम