MarathwadaNewsUpdate : प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य , आ. बांगर यांच्या विरोधात ‘वंचित’चे आंदोलन

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आ. संतोष बांगर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून त्यांच्याविरुद्ध अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा , अशी मागणी पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच आमदार संतोष बंगार यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
यावेळी,जिल्हा महासचिव रविंद्र भाऊ वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर, शहर अध्यक्ष अतीखुर रहेमान,जिल्ह्याचे नेते विनोद नाईक,युवा जिल्हाध्क्ष योगेश नरवाडे,रतन लोणकर,रवी शिखरे,प्रल्हाद धाबे,बबन भुकतर,प्रमोद जोंधळे,लखन खंदारे,राहुल पुंडगे,नितीन खिल्लारे,सिद्धार्थ वाघमारे,अजीस खान पठाण,निखिल कवने,संतोष सावंत,विष्णू हिवरे,सुशील कसबे,देविदास नांदूरे, बंटी ठोके आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आपल्या निवेदनात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि , वंचित बहुजन आघाडी हा शोषित, पीडित , वंचित आणि स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या सामान्य लोकांचा पक्ष आहे. हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने गावागावात आपला मतदार आणि कार्यकर्ता निर्माण केला आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ओबीसी,मायक्रो ओबीसी,आदिवासी,मुस्लिम,अशा सर्व जातीधर्माचे स्वाभिमानी लोक वंचित बहुजन आघाडी आपला हक्काचा पक्ष म्हणून बघत आहेत. परंतु सत्ता ही फक्त पैसा कमावण्याचे साधन म्हणून बघणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे.
येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला वंचितच्या निमित्ताने आपला पराजय दिसू लागला आहे आणि शिवसेनेला टक्कर देणार एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. म्हणूनच आमदार संतोष बांगर सारखे लोक ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत असे कितीतरी आरोप बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात सहन केलेले आहेत. परंतु कोणताही राजकीय पक्ष हे आरोप सिद्ध करू शकला नाही. राज्यात शिवसेना सत्तेत आहे . शिवसेनेने ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपतीची चौकशी करावी . उगाच डोक्यावर परिणाम झाल्यासारखे बिनबुडाचे आरोप करून आपल्या अशिक्षित बुद्धीचा देखावा करू नये.
आमदार संतोष बांगार यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे असून त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत काही पुरावा असेल तर तो सादर करावा अन्यथा त्यांच्यावर ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे हेलिकप्टरमधून का फिरतात हे वक्तव्य म्हणजे जातिय द्वेषाच्या भावनेतून असून संतोष बंगर याच्यावर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात म्हटले आहे.