Aurangabad Crime Update : इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला ४५ लाखांचा गंडा, एक अटक

औरंगाबाद- इंटरनेट सर्व्हिस नागरिकांना देणाऱ्या कंपनीतील जुन्या भागीदाराने इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मुख्य अएडमिनचा आयडी व पासवर्ड चो रून ६०० सेवा धारकांना लॉगआउट करत ४५ लाख रु,चे नुकसान केले. याप्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांना मिळताच त्या इसमावर माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या.
तलाह मोहम्मद अनिस (३२)रा मजनूहील राशीदपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा जुना भागीदार मो. मोईनोद्देन मो. कामरोददीन होते. वरील दोघाचा शहरात२०२० साली इंटरनेट सर्व्हिस नागरिकांना पुरवण्याचा व्यवसाय होता. पण पुढे दोघानी परस्परांच्या संमतीने व्यवसाया तील भागीदारी बंद केली. पण मोहम्मद तलाह मो अनिस याला समजले की, मोईनोददीन याने मुंबई तील सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीची फ्रेंचाईझी घेतली आहे . त्यांनतर काही दिवसांनी आरोपी तलाहा ने मोईनोदीच्या सेवा सर्व्हिसचा पासवर्ड आयडी चोरला व ६०० सेवा धारकांना लॉगआउट केले त्यामुळे सेव्हन स्टार डिजिटल कंपनीचे ४५ लाख रु चे नुकसान झाले. वरील कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्तां , पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पॉलस निरीक्षक अमोल सातोदकर, पीएसआय राहुल चव्हाण, पोलीस कर्मचारी रामप्रसाद काकडे यांनी पार पाडली