AurangabadNewsUpdate : पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक

औरंगाबाद : सतत एक दशक सातत्यपूर्ण उत्कुष्ट सेवेचा अभिलेख असलेल्या पोलीस अधिकाऱयांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात २१ मार्च रोजी झालेल्या समारंभात गौरवण्यात आले. या मध्ये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दोन सहाय्य्क पोलीस आयुक्त , एक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक अश्या चौघांचा समावेश आहे. सहाय्य्क पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के, (प्रशासन विभाग) निशिकांत भुजबळ ( सिडको विभाग ) गौतम पातारे , पोलीस निरीक्षक, गोरख चव्हाण पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे, वरील चारही अधिकाऱयांचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्तां यांनी कौतुक केले आहे.