AurangabadCrimeUpdate : दोन वॉंटेड आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंगाबाद- शहरातील सहा पोलीस ठाण्याना तसेच खुलताबाद पोलिसांना वॉंटेड असलेले दोन गुन्हेगार गुन्हेशाखेने पकडले एकाला सिडको पोलिसांच्या तर एकाला खुलताबाद पोलिसांच्या हवाली केले.
बबन मकळे, (३५) रा. मुकुंदवाडी व अक्षय रमेश वाहूळ (२०) सातारा परिसर अशी अटक आरोपीची नावे आहेत शहरातील दुकाने आणि घर फोडण्यात तरबेज असलेले वरील दोघे शहर आणि ग्रामीण पोली सांना वॉंटेड होते, बबन मॅक्ळे ने शहरातील सिडको, जवाहरनगर, सातारा, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, उस्मानपुरा क्रान्तीचौक या पोलीस ठाण्याच्या हददीत गुन्हे केल्याचे सांगितले. तर अक्षय वाघूळ ने खुलताबाद गावात चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले,
मकळे ला सिडको पोलिसांच्या तर वाहुळ ला खुलताबाद पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पीएसआय कल्याण शेळके पोलीस कर्मचारी रमाकांत पटारे , राजेंद्र सालूंके, अझर कुरेशी शेख हबीब यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई पार पाडली