AurangabadCrimeUpdate : रखेलीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक

औरंगाबाद : रखेलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर तिला बेशुध्द अवस्थेत सौडून फरार झालेल्या रिक्षाचालकाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अजमतखान पिता अनिसखान(२९) रा.चंपाचौक असे अटक आरोपीचे नाव आहे. दीड महिन्यांपूर्वी २फेब्रु.रोजी आरोपी अजमत नेमुकुंदवाडी परिसरात राहणार्या कविता सचिन वानखेडे रा.खोतकरवाडा मुकुंदवाडी या रखेलीला किरकोळ कारणावरुन लाथाबुक्क्याने तुडवले.ती बेशुध्द झाल्यानंतर अजमत फरार झाला होता.
दरम्यान मुकुंदवाडी परिसलात बेशुध्द अवस्थेत सापडलेल्या महिलेवर पोलिसांनी घाटी रुग्णालयात उपचार सुरु केले. त्यानंतर ६फेब्रुवारीला डाॅक्टरांनी कविताला तपासुन मयत घोषित केले.दरम्यान मुकुंदवाडी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर खबर्याने कविताला तिच्या मित्राने माहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार अजमत चा शोध घेत त्याला अटक केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी करंत आहेत