AurangabadCrimeUpdate : जागतिक महिला दिनी मैत्रीणीवर बलात्कार

औरंगाबाद – जागतिक महिला दिनी लाॅजवर उतरलेल्या नव्या मैत्रीणीशी ओळख करुन देतो असे सांगून ८मार्च रोजी मारहाण करंत लैंगिक शोषण करणार्या इसमाला मुकुंदवाडी पोलिसांनी आजरात्री १०वा अटक केली. आनंद सिताराम शिंदे(२१) रा.भगतसिंगनगर हर्सूल असे अटक आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी आज (९/०३)रात्री ८वा.गुन्हा दाखल झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पिडीता व आरोपी हे नात्यातले आहेत. गेल्या ३/४ वर्षापासून दोघांचे घनिष्ठ सबंध होते.याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पिडीतेला सिडको बसस्टॅंड समोरील हाॅटेल अरोरा मधे नवी मैत्रीण आली आहे. भेटायला चल म्हणून गळ घातली. आलेली मैत्रीण मात्र सुमनांजली रुग्णालया जवळ दोघांची वाट पहात उभी होती.पण तिला चुकवुन आरोपीने पिडीतेला हाॅटेलवर नेले व मारहाण करंत जबरदस्ती लैंगिक शोषण केले. या प्रकरणाने पिडीता हादरुन गेली होती. आज धाडस करुन तिने मुकुंदवाडी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद देताच आरोपी अटक करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे करंत आहेत