RussiaUkraineWarUpdate : आज दिवसभरात : युक्रेनच्या राजधानीवर रशियाकडून क्षेपणास्त्रांचा पाऊस… !!

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनची राजधानी कीववर सर्व दिशांनी जोरदार हल्ला करण्याचे आदेश दिले असून युक्रेनच्या सैन्याच्या तितकाच जोरदार प्रतिकार सुरु केला आहे. दरम्यान युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की त्यांनी कीववर हल्ला करण्याचा रशियन सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मात्र काही रशियन सैन्य राजधानीत दाखल झाले आहे. शुक्रवारी, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान, दोन्ही सरकारांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी चर्चेचे खुले संकेत दिले असले तरी, रशियन सैन्य अजूनही युक्रेनमध्ये कहर माजवला आहे. दुसरीकडे, कीवमधील अधिकाऱ्यांनी नागरिकांना रशियन सैन्याला रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैन्याला मदत करण्याचे आवाहन केले असून युक्रेनच्या शहरांवर रशियाच्या क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून रशियाने युक्रेनच्या एअरबेस आणि महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवमध्ये कर्फ्यू कडक करण्यात आला असून कर्फ्यू मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरुद्ध शत्रूप्रमाणे वागण्याच्या सूचना लष्कराला देण्यात आल्या आहेत. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सर्गेई निकिफोरोव्ह यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, युक्रेन युक्रेन युद्धविराम आणि शांततेबद्दल रशिया बरोबर बोलण्यास तयार होता आणि असेल. याबद्दल क्रेमलिनने यांनी म्हटले आहे कि, त्यांनी बेलारशियनची राजधानी मिन्स्क येथे युक्रेनियन अधिकाऱ्यांना भेटण्याची ऑफर दिली होती, परंतु युक्रेनने त्याऐवजी वॉर्सा हे ठिकाण प्रस्तावित केले होते. त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चर्चेबाबत गंभीर असतील तर त्यांच्या सैन्याने युक्रेनवर बॉम्बफेक करणे थांबवावे.
भारताची भूमिका तटस्थतेची , मतदानात सहभाग नाही
दरम्यान युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईबाबत असहमत असलेल्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतदान घेण्यात आले. भारत, चीन आणि यूएईने या मतदान प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवले. मात्र रशियाच्या व्हेटो पॉवरने या प्रस्तावाचा मार्ग रोखला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी सांगितले की, रशियाला युक्रेनवर सत्ता काबीज करायची नाही परंतु राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे ठेवल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकेल असे म्हटले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात युक्रेनचे संकट चर्चेद्वारे सोडवण्यास पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केल्यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे. दरम्यान “मी पुन्हा एकदा युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या लष्करी कर्मचार्यांना निओ-नाझी आणि (युक्रेनियन कट्टरपंथी राष्ट्रवादी) त्यांची मुले , पत्नी आणि वृद्धांना मानवी ढाल म्हणून न वापरण्याचे आवाहन करीत आहे,” असे पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या टेलिव्हिजन बैठकीत म्हटले आहे. “सत्ता तुमच्या हातात घ्या, म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणे सोपे होईल.” असेही त्यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनियन बंडखोरांच्या ताब्यातील दोन क्षेत्रे स्वतंत्र केल्याची घोषणा केल्यानंतर त्याचा निषेध म्हणून अमेरिकेने रशियन बँका, कर्ज, मदत यावर निर्बंध लादले आहेत. दरम्यान युक्रेनच्या शहरांवर रशियाच्या क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून रशियाने युक्रेनच्या एअरबेस आणि महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. याबाबत युक्रेनने सांगितले की आतापर्यंतच्या प्रतिहल्ल्यात एक हजाराहून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. तथापि, रशियाने मृतांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. यूएन ने मात्र २५ नागरिक ठार तर १०२ जखमी झाल्याचे म्हटले आहे.