Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी युक्रेनबाबत चर्चा केली असून युक्रेनमधील  हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगभरातील देश चिंतेत असून अमेरिकेसह पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादण्याची चर्चा करत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली व युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आवाहन केले. सांगण्यात येते कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात जवळपास २५ मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक राहिली. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असे नमूद करतानाच युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे आवाहन मोदी यांनी या चर्चेदरम्यान पुतीन यांना केल्याचे सांगण्यात आले. रशियाचा नाटो देशांशी वाद असेल तर त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले.

भारतीयांना बाहेर काढण्यास पुतीन यांचा सकारात्मक प्रतिसाद

युक्रेनमध्ये भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांना तिथून सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान आहे. यावर मोदी यांनी पुतीन यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्याला पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुतीन यांनी एकंदर स्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केले तसेच ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर पुढे अधिक विचारमंथन करण्यावर दोन्ही नेत्यांचे  एकमत झाले . भारत आणि रशिया या दोन देशांत मैत्रीचे संबंध राहिले आहेत. त्याआधारावर दोन्ही नेत्यांमधील चर्चा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली.

दरम्यान युक्रेन -रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संकटाचा आर्थिक परिणाम आणि वादामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अधिकारी यांचा या बैठकीत समावेश होता. गुरुवारी, रशियन सैन्याने अनेक युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आणि आपले सैन्य युक्रेनच्या किनारपट्टीवर उतरवले, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईला मंजुरी दिल्यानंतर अधिकारी आणि माध्यमांनी सांगितले.

युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा देश (युक्रेन) रशियन लष्करी आक्रमणामुळे उद्भवलेल्या संकटावर भारताच्या भूमिकेवर “खूप असमाधानी” आहे. त्याचवेळी त्यांनी परिस्थिती सामान्य करण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ज्यांचे ऐकतात अशा काही नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक आहेत आणि भारत रशियाशी असलेल्या या जवळीकीचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो, असे ते म्हणाले. राजदूत म्हणाले की युक्रेन या संकटावर भारताची भूमिका पाहत आहे आणि त्याबद्दल “अत्यंत असमाधानी” आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!