MarathawadaNewsUpdate : बीडच्या नोंदणी कार्यालयासमोर गोळीबार , २ जखमी

बीड : बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या रजिस्ट्री ऑफिस आवारात दोघांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला असून लगेचच घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. या गोळीबारात जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
या बाबतची अधिक , बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयास जवळ असणारे रजिस्ट्री ऑफिस याठिकाणी शेतीच्या वादातून निर्माण झालेल्या मोठ्या वादातून हाणामारीला सुरुवात झाली. त्यातूनच हा गोळीबाराचा प्रकार घडला. या घटनेमध्ये सतीश बबन क्षीरसागर, फारुख सिद्दीकी या दोघांवर अज्ञात व्यक्तीकडून हा गोळीबार झाला. जमीनीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक आहेत.
दर्म्य या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या सतीश आणि फारूक याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे.