AurangabadCrimeUpdate : दोन अल्पवयीन मुलींचे शोषण , एक गर्भवती, दोघांना बेड्या

औरंगाबाद – मुकुंदवाडी परिसरातील विजयनगर आणि मुकुंदनगरातील अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्याने एक ड्रायव्हर आणि एका मजुराला मुकुंदवाडी पोलिसांनी बलात्काराच्या व पोक्सोच्या गुन्ह्यात आज गुरुवारी अटक केली. अक्षय गोविंद दराडे(२१)धंदा ड्रायव्हर रा.मुकुंदनगर व अमोल सुभाष पवार(२७) रा.संजयनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी अक्षय दराडे ने नोव्हेंबर २०२० पासून ज्या पिडीतेचे शोषण केले.तिला लग्नाचे अमीष दाखवले होते. आठ महिन्यांची गर्भवती झाल्यावरही आरोपी लग्नास टाळाटाळ करंत होता.शेवटी कंटाळून पिडीतेच्या पालकांनी पिडीतेला फिर्याद द्यायला लावल्यानंतर आरोपी अक्षय दराडेला अटक केली.तर आरोपी अमोल पवार हा पिडीतेच्या पालकांच्या वाड्यात किरायाने राहात होता.आॅगस्ट २०२१पासुन त्याने घरमालकाच्या मुलीचे शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीतेच्या पालकांनी पुढाकार घेत पिडीतेला फिर्याद देण्यास सांगितले.वरील दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन मिरधे व पीएसआय वाघ करंत आहेत.