AurangabadCrimeUpdate : उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू , महिला डाॅक्टरचा विनयभंग करणाऱ्या पतीला बेड्या

औरंगाबाद : कॅन्सरचा उपचार करणार्या डाॅक्टरला पत्नीच्या मृत्यूनंतर ‘आय लाईक यू…’ असे म्हणून अंगाशी लगट करणार्या इसमाला सिटीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कन्हैया वसंत टाक रा.कैलासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी गेल्या ३फेब्रुवारी पासून कर्करोग शासकीय रुग्णालयात कॅन्सरचे उपचार घेत होती.पण ८ फेब्रुवारी रोजी रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तेथील डाॅक्टरांनी घरी नेण्यास सांगितले.
दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर आरोपी कन्हैया टाक याने १३ व्याची पत्रीका कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.अरविंद गायकवाड व इतर डाॅक्टरांना दिली आणि पिडीत महिला डाॅक्टरला ‘आय लाईक यू…’ असे म्हणाला. फिर्यादी महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार नंतर रोज आरोपी टाक काही तरी निमीत्त काढून कर्करोग रुग्णालयात येत असे. दरम्यान २२ फेब्रु.रोजी रात्री १० वा.पिडीता तिच्या महिला सहकार्या सोबत बाहेर जात असतांना आरोपी टाक याने पिडीतेचा व्हाॅट्सअॅप नंबर मागत तिच्या अंगाशी लगट केली. यानंतर चिडलेल्या पिडीतेने सिटीचौक पोलिसांना तक्रार देताच आरोपी कन्हैया टाक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कर्मचारी भोपळे करंत आहेत
घटस्फोटीत मावस बहीणीचे शोषण, गर्भपात करुन मावसभाऊ फरार
औरंगाबाद : घटस्फोटीत मावसबहीणीचे शोषण करंत गर्भपात करवणारा मावसभाऊ बलात्काराचा गुन्हा दाखल होताच फरार झाला.क्रांतीचौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
राहूल रामेश्वर इप्पर(२४)मु.पो. हिरवड, ता.लोणार जि.बुलढाणा हल्ली मु.भोईवाडा असे आरोपीचे नाव आहे. गेल्या जून२१ते डिसेंबर२१या काळात घटस्फोटीत पिडीतेकडून पोटगीचे मिळालेले ५लाख रु.हडप करुन तिला व तिच्या मुलीला सांभाळतो असे म्हणंत आरोपीने शोषण केले.पिडीता गर्भवती झाली तेंव्हा लग्नापूर्वी गर्भधारणा अयोग्य आहे म्हणंत तिचा गर्भपात घडवला. पिडीतेला पहिल्या पती पासून ४ वर्षाची एक मुलगी आहे. तिचा खून करण्याची धमकी देत.आरोपीने पिडीतेला गप्प केले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल सोनवणे करंत आहेत.
सराफाला भर दिवसा लूटले चार तोळे सोने हिसकावले
औरंगाबाद : सोन्या चांदीचे दुकान बंद करुन घरु परतणार्या सराफाला जटवाड्याजवळील रसुलपुरा घाटात काल दुपारी (२२ फेब्रु)सव्वापाचच्या सुमारास चौघांनी मारहाण करंत लूटले.व त्याच्या जवळील १ लाख ४५ हजारांचे चार तोळ्याचे दागिने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी आज संध्या.७.३० वा.हर्सूल पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश एकनाथ टाक(२३) रा.सारावैभव जटवाडा असे लूटलेल्या सराफाचे नाव आहे. शैलेश टाक याचे काटशेवरी फाट्यावर सोन्याचांदीचे दुकान आहे. २२फेब्रुवारी रोजी शैलेश घरी परतत असतांना विनाक्रमांक दुचाकीवर बसलेल्या दोघांनी रसुलपुरा घाटात शैलेश ला अडवले.व अन्य पायी असणार्या दोघांनी शैलेश ला ढकलून त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागिने असलेली बॅग पळवली.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रफिक शेख करंत आहेत.