MaharashtraPoliticalUpdate : खा. संजय राऊत यांनी डोंगर पोखरुन उंदीर पण काढला नाही – केशव उपाध्ये

औरॅगाबाद : संजय राऊत यांनीडोंगर पोखरुन उंदीर पण बाहेर काढला नाही अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांची महानायक शी बोलतांना खिल्ली उडवली. डोंगर पोखरुन उंदीर काढला अशी मराठीत एक म्हण आहे. ती म्हण सुध्दा राऊत यांना सार्थकी लावता येत नाही.भाजपावर बिनबुडाचे आरोप करुन भंपकबाजी करण्यात राऊत पटाईत आहेत.त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देणेही हास्यास्पद वाटते.खा. संजय राऊत यांनी भाजप च्या राज्यातील शासन काळात २५हजार कोटींचा महा घोटाळा केल्याचा आलोप करणारी पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर उपाध्ये यांनी ‘महानायक’शी संवाद साधतांना काही मुद्दे उपस्थित केले.
महाविकास आघाडीचे गेल्या अडीच वर्षांपासून शासन आहे.त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षावर आरोप करुन सिध्द करायला हवे होते.पण तसे का झाले नाही? कोव्हिड च्या काळात झालेला भ्रष्टाचार यावर कधी राऊत बोलंत नाहीत.महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या शासनाला काॅंग्रेस रा.काॅ सहित जनता वैतागल्याचे हे उदाहरण आहे.नैराश्यातून राऊत आरोप करताहेत.असे शेवटी ते म्हणाले