AurangabadNewsUpdate : लहान भावाने न्यायालयाचे खोटे शिक्के वापरून भूखंड बळकावला कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल

औरंगाबाद- लहानुभावाने न्यायालयाच्या आदेशाचे खोटे शिक्के मारून भूखंड बळकावल्याचा गुन्हा सिडको पोलिसठाण्यात कोर्टाच्या आदेशाने दाखल झाला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
चंद्रकांत लक्षमीकांत शिरखेडकर (५९) रा. नागपूर असे गुन्हा दाखल झालेल्या सरकारी अधिकाऱ्याचे नाव आहे. आरोपीने सीडकोतील आईच्या नावे असलेला सामाईक भूखण्डाच्या वाटण्या केल्याचे कागदपत्र महापालिकेला सादर करून भूखण्डाची वाटणी झाल्याचे दस्त ऐवज तयार केले. असा आरोप फिर्यादी चंद्रकांत शिरखेडकर (६१) रा. गारखेडा यांनी न्यायदडा धिकाऱयांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीत नमूद केले की, आरोपी सुधीर शिरखेडकर याने २००७ साली बोगस दस्त ऐवज तयार करून वडिलोपार्जित भूखण्डाची वाटणी झाल्याचे दस्तऐवज तयार केले . ही तक्रार माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलांवरून करण्यात आल्यामुळे कोर्टाने सीडको पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
सिडको पोलिसांनीही मुख्य प्रशासक सिडको यांना आरोपीने भूखंड वाटणीचे दाखल केलेल्या दस्त ऐवजाची सत्यप्रत मागण्यांसाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली . या प्रकरणी बोलतांना सिडको चे प्रशासक भुजन्गराव गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणाची आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत