AurangabadCrimeUpdate : सीआरपी जवानाविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा

औरंगाबाद : आपल्या मुलांसह पतीपासून विभक्त राहणा-या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण करून आर्थिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून छावणी सीआरपी पथकात काम करणार्या पोलिस कर्मचार्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप लक्ष्मण पवार असे फरार आरोपीचे नाव असून तो छावणी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या पथकात काम करतो .गेल्या वर्षभरापासून एका विभक्त राहणार्या पीडित महिलेची आणि त्याची ओळख झाली होती. या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , आरोपीने आधी तिच्याशी ओळख वाढवली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आणि धर्मांतराचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या विवाहितेला दोन मुले आहेत. दरम्यान पीडितेने तक्रारीत पुढे म्हटले आहे कि , त्याने केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गरोदर राहिली तेंव्हा त्याने गर्भात करून टाक अन्यथा तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली त्यामुळे तिने गर्भपात करून घेतला. पुढे तिने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला तेंव्हा आरोपीने तिला मारहाण केली याबद्दल तिने यापूर्वी सिडको पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. परंतु मी आधीही खून केलेले आहेत अशी धमकी दिली.
आरोपीने माझ्या पैशातून कार व भूखंड घेतल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आरोपी संदीप पवार याच्याविरुद्ध भादंवि 376, 313,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग भागिले करंत आहेत