Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार होता त्याचे काय झाले ? मल्लिकार्जुन खर्गे यांचा सरकारवर हल्ला बोल

Spread the love

नवी दिल्ली : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत 60 लाखरोजगार निर्मितीची घोषणा केली होती. त्यावरून खर्गे यांनी राज्यसभेत बोलताना सर्व्हरवर निशाणा साधला.


आपल्या भाषणात खर्गे म्हणाले कि , 2014 च्या निवडणुकीत तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? आणि आता येत्या पाच वर्षांत 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन देत आहात. देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. मोठे कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक येत नाही आणि सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याने तरुण अडचणीत आले आहेत. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला च्या प्रश्न उपस्थित करताना म्हटले कि , 2014 मध्ये तुम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधारे तुम्ही आतापर्यंत 15 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. पण प्रत्यक्षात तुम्ही किती नोकऱ्या दिल्या?.

कुठल्या खात्यात किती पदे रिक्त ? याची अधिकृत आकडेवारी देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले कि , केंद्र सरकारमध्ये नऊ लाख पदे रिक्त आहेत. रेल्वेमध्ये 15 टक्के, संरक्षण क्षेत्रातील 40 टक्के आणि गृहखात्याशी संबंधित 12 टक्के पदे रिक्त आहेत, मग ती का भरली जात नाहीत? आज शहरी भागात बेरोजगारीचा दर नऊ टक्क्यांवर तर ग्रामीण भागात 7.2 टक्क्यांवर गेला आहे. त्यावर सरकारचे काय उत्तर आहे ?

आपलं सरकार

Click to listen highlighted text!