AurangabadCrimeUpdate : बेरर चेक ने लाच स्विकारली, ग्रामसेवक अटकेत

औरंगाबाद – पेव्हर ब्लाॅक चे बील काढून देण्याकरता ठेकेदाराकडून बेरर चेक ने लाच स्विकारल्या प्रकरणी निमगाव चा ग्रामसेवक वसंत इंगळे(४२) याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करंत अटक केली.
आरोपी ग्रामसेवक इंगळे ने ठेकेदाराला पेव्हर ब्लाॅक चे बील काढण्या करता ४०हजार रु. लाच पंचासमक्ष १७जानेवारी रोजी मागितली.व फिर्यादीकडून चेक घेतला.आरोपीने ५हजार रु. कमी करत चेक वटवून घेतला .या प्रकरणी पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी सापळा पार पाडला.त्यांच्या समवेत पोलिस कर्मचारी सुनिल पाटील,नागरगोजे, सी.एन.बागूल यांचाही सहभाग होता.पोलिस अधिक्षक राहूल खाडे,अप्पर पोलिस अधिक्षक विशाल खांबे,उपअधिक्षक मारुती पंडित यांनी वरील कारवाईसाठी मार्गदर्शन केले.