LataMangeshkarHealthLattestUpdate : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर , आयसीयू मध्ये चालू आहेत उपचार

मुंबई : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीच्या ताज्या अपडेट्सनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.त्यांची कोरोना चाचणी 8 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्या आयसीयू युनिटमध्येच आहेत. डॉ. प्रतित समदानी यांच्या देखरेखीखाली त्यांचे सहकारी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. या डॉक्टरांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार त्या अजूनही आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली आहेत. याशिवाय इतर कोणतीही माहिती देता येणार नाही.
अफवा पसरवू नका
लता मंगेशकर रुग्णालयात बऱ्या होत असताना, त्यांच्या टीमने एक निवेदन जारी जरी करताना म्हटले आहे कि , “लता मंगेशकर यांच्या शुभचिंतकांनी खोट्या बातम्यांपासून दूर राहावे. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लता दीदी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेतत्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी आपण प्रार्थना करूया.”