Aurangabad Crime : मिसारवाडी खून; गुन्हेशाखेने आवळल्या मुख्य आरोपीच्या मुसक्या

औरंगाबाद – हसन जावेद चा खून करणाऱ्या तालेब चाऊस ला गुन्हे शाखेने दौलताबादेहून अटक केली. आरोपीला सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे मयत हसन ने तालेब चा काही महिन्यांपूर्वी खून करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी तालेब ने मयत हसन च्या घरी येऊन तुला बघून घेईन अशी धमकी दिली होती ती खरी केल्याचा जबाब अटक आरोपी तालेब ने गुन्हे शाखेला दिला. वरील कारवाई पोलिसानिरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके पोलीस कर्मचारी किरण गावंडे, विठल सुरे ओमप्रकाश बनकर यांनी पार पाडली.