AurangabadNewsUpdate : समृद्धी महामार्गावर भंगार चोरणारे मुद्देमालासह जेरबंद

औरंगाबाद – समृद्धी महामार्गावर सुरु असलेल्या कामाचे सहित्य चोरून भन्गार मध्ये विक्री करणारे चोरटे गुन्हे शाखेने मुद्देमालासहित अटक केले आहेत. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला होता.
सलाउददीन शहा शाहिद शहा व शेख अरबाज शेख नूर दोघेही रा. अंबरहील अशी अटक आरोपीची नावे आहेत .
नायगाव परिसरात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी वरील दोघे रात्री अपरात्री सामान उचलून नेतात व भांगार मध्ये विक्री करतात अशी माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके यांच्या पाटाहाकाने वरील चोरटयांना मुद्देमालासहित अटक केली.
वरील दोघे गेल्या अनेक दिवसांपासून नारेगावातील भगार व्यापारी इम्रान व जिनसी परिसरातील अन्य एका व्यापाऱ्याला भं गार विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान पोलीस निरीक्ष अमोल देवकर यांनी सांगितले की, यापूर्वी वरील कोर्टे नायगाव परिसरातून समृद्धी महामार्गावरून चोऱ्या करून भं गार विक्री करत असल्याची माहिती महामार्गाचे व्यवस्थापक चिकनगी रामनजुला रेडडी (३९) यांनी दिली आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे. रेडडी यांच्या फिर्यादीवरूनच वरील गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस करत आहेत.
सायबर पोलीस ठाण्याकडून आलेले दोन गुन्हे दाखल एक अटक
औरंगाबाद – शहरात छावणी आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर बदनामी करणारे मजकूर प्रसिधद झाल्यामुळे सायबर पोलीस ठाण्याच्या सूचनेवरून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीस्थित पत्रकार अजित भरतीवर शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलांचे बदनामी करणारे एप; बाबत सविस्तर सोशल मीडियावर प्रसारित करणारी पोस्ट केल्यानंतर शहरातील महिला वकील एड . अस्मा शफिक शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तर बेगमपुरा पोलीस ठाण्यात एका विद्यार्थीनीची बदनामी करणारा मजकूर नोव्हेंबर २१ मध्ये प्रसिधद झाला होता त्या प्रकरणात आरोपी अनिकेत बनकर रा. हडको याला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे आणि प्रशांत पोतदार करत आहेत.