MaharashtraNewsupdate : सहकार क्षेत्राविषयी सल्ले देण्याचे काम करू नये , देशात लवकरच सहकार विद्यापीठ : अमित शहा

प्रवरानगर : मला सहकार क्षेत्राविषयी कोणीही सल्ले देण्याच काम करू नये. आम्ही सहकारी क्षेत्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार. सध्या यासंदर्भात कोणतीही समिती नेमणार नाही. आम्ही लवकरच सहकार विद्यापीठ बनवणार आहोत.भारत सरकार एकाही सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण होऊ देणार नाही. मी सहकार मंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, हे सहकार तोडण्यास आले मात्र मी सांगू इच्छितो कि मी सहकार जोडण्यास आलो आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.
महाराष्ट्र के लोनी में आयोजित ‘सहकार परिषद व कृषि सम्मेलन’ को संबोधित करते हुए। महाराष्ट्रातील लोणी येथे आयोजित 'सहकार परिषद व कृषि संमेलनात' संबोधन करतांना… https://t.co/m6JmdK3N5v
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) December 18, 2021
अहमदगरच्या लोणीमध्ये देशातील पहिली सहकार परिषद पार पडली. या सहकार परिषदेत शहा बोलत होते. या सहकार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. या सहकार परिषदेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित शहा पुढे म्हणाले कि , महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेला आयडियल मानले जात होते पण आज स्थिती काय झाली आहे? या बँकांमध्ये हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले ? हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? तर अजिबात नाही. मी राजकीय टीप्पण्णी करण्यासाठी आलो नाही. मी एवढ निश्चित सांगतो कि सहकारासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही करणार आहोत.मला आनंद आहे कि सर्व साखर कारखान्यांचे खाजगीकरण होत असताना प्रवरा साखर कारखाना अजूनही सहकारी तत्वावर सुरू आहे हि आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. मी सहकारमंत्री बनल्यावर अनेक फ्रश्न उपस्थित झाले. मी सहकारमध्ये काही तोडण्यासाठी आलेलो नाहीये तर जोडण्यासाठी आलो आहे. मात्र, राज्य सरकारनेही राजकारण बाजुला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहिले पाहिजे .
देवेंद्र फडणवीस
दरम्यान यावेळी अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनीही या स्टेजवरून टोलेबाजी केली. “देशात नरेंद्र मोदींचं आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आले , तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधलं काय कळतं? आता सहकारचे काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले”, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला. “अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असे सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ देखील अडचणीत आहे”, असं फडणवीस म्हणाले. “माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा”, असं देखील त्यांनी नमूद केलं.
“कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्याच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे हे शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र चाललेले आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे”, असेही फडणवीस म्हणाले.