Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बंगळुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे तणाव

Spread the love

बेळगाव : बंगळुरूमधील सदाशिव नगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त अरण्यात येत आहेत.   गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे. यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून धर्मवीर संभाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी  दगडफेकीच्या घटनाही घडत असून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  तणावामुळे शहरात बंदचे वातावरण आहे.  त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

खा. संजय राऊत यांचे ट्विट

बेंगळुरूतील या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून त्यांनी  ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना होते, असे  म्हणत त्यांनी म्हटले आहे कि , दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात अशा प्रकारे विटंबना होते, हे चित्र बेंगळुरूतील आहे. धिक्कार असो, ऊठ मराठा ऊठ!’ असं ट्विट त्यांनी केले .

‘एका बाजूला काशीमध्ये पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करतात आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय. हा संतापजनक प्रकार भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूत घडला आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. हिंदूंनो, आता उठा, जागे होण्याची वेळ आलीय.’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले  आहे.

या घटनेबद्दल  कोल्हापूरातही शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कर्नाटक व्यावसायिकांची हॉटेल बंद केली. युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरीतील कर्नाटक व्यावसायिकांची हॉटेल बंद केली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची विटंबना केली असून हॉटेल बंद करा असे हॉटेल मालकांना सांगितले आणि शिवसैनिकांनी हॉटेलची शटर बंद केली. त्यानंतर शिवसैनिकांनी शिवाजी चौकात कर्नाटकातील गुंडाच्या कृत्याचा निषेध करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. यापुढे कर्नाटकला जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!