AurangabadNewsUpdate : सुहास दाशरथे यांना लवकरंच महत्वाची जबाबदारी : पानसे

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या बरेच बदल करण्यात येत असून औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरून बदलल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती या नाराजीची दखल घेत लवकरंच त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असून यापुढे विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असल्याची माहिती मनसेचे जेष्ठ नेते अभिजित पानसे यांनी ‘महानायक’शी बोलतांना दिली.
राज ठाकरे हे पक्ष बांधणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते.त्यावेळेस सुहास दाशरथेंची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली.या विषयाला धरुन औरंगाबादच्या मनसे वर्तूळात विविध चर्चांना उधाण आले आहे.थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरेंनी मुंबईत मनसे नेत्यांची एक बेठक घेतली.त्यामधे सुहास दाशरथेंना नवी जबाबदारी देण्याबाबत राज ठाकरेंनी सूचना दिल्याचे अभिजित पानसे म्हणाले. तसेच महाराष्र्ट नवनिर्माण सेनेत संघटनेतील अंतर्गत बदल पक्षाला सुस्थितीत आणण्या करता केलेले असतात.त्या करता कार्यकर्त्यांनी नसती कुजबुज करुन अफवा उठवू नयेत.यावर पदाधिकार्यांनी लक्ष ठेवायलाच पाहिजे.ते पक्षाच्या दृष्टीने हिताचं ठरेल असे शेवटी पानसे म्हणाले.