IndiaNewsUpdate : अरे रे !! राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायकची आत्महत्या

Shocking red stamp text on white
धनबाद : राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, असे सांगण्यात येत आहे. कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
कोनिका लायक पूर्वी जुन्या रायफल वापरायची. त्या रायफली तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत असे. यानंतर, जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला तिच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने या नवोदित खेळाडूला मार्च महिन्यात एक नवीन रायफल भेट दिली. जेणेकरुन ती तिच्यातील कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल. जयदीप कर्माकर यांनी कोनिकाला उत्तम प्रशिक्षणासाठी अकादमीत नेले होते.
या घटनेबाबत ‘ट्रिब्यून’शी संवाद साधताना अकादमी व्यवस्थापनाने सांगितले की, गेल्या १० दिवसांपासून कोनिका प्रशिक्षणासाठी फार कमी वेळा सत्रांमध्ये येत होती. तर जयदीप कर्माकर म्हणाले कि , “हे खूपच धक्कादायक आहे. पूर्वी ती तिचा व्यायाम व्यवस्थित करत होती. मात्र काही दिवसांनी ती प्रशिक्षण सत्रात अनियमितपणे येत होती. यामागे काय कारण आहे हे मला माहीत नाही मात्र ती लवकरच लग्न करणार होती. काय झाले आणि कोणत्या दबावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले हे मला खरोखरच माहीत नाही. कोनिकाच्या या कृत्यामुळे भारतीय क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे.