AurangabadCrimeUpdate : किरकोळ कारणावरून दोन खून तर दोन अपघातात दोन ठार

औरंगाबाद – शहरातील दौलताबाद आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात दोन खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एक बाजेवरून तर दुसऱ्या खुनाचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलीसउपायुक्त उज्वला वानकर यांनी सांगितले . याशिवाय दोन अपघातात दोन जण ठार झाले.
कृष्णा शेषराव जाधव (२२)रा. टीव्ही सेंटर हडको
बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हददीत हिमायतबागे जवळील भिंती जवळ कृष्णाला आज पहाटे १२. ते दोनच्या दरम्यान धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला या प्रकरणी मयताच्या वडलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी अज्ञात असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर डुलताबाद पोलीस ठाण्याच्या हददीत करोडी शिवारात बरडाबाई गोविंद नरवडे(६०) यांचा डोक्याला गंभीर दुखापत करून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवारा तील मजूर सचिन नरवडेवर पोलिसांचा संशय आहे. सचिन नरवडे याने बारडा बाईंची बाज झोपडीबाहेरून उचलून विकून टाकली यामुळे बरडाबाईंचे आणि सचिन चे भांडण झाले होते. अशी माहिती मयत बर्डाबाईच्या मुलीने पोलिसांना दिली.त्यामुळे पोलिसांचा सचिन नरवडेवर संशय बळावला . या प्रकरणी घटनास्थळी पोलीस उपायुक्त अपर्णाला गीते, उज्वला विणकर, सहाय्य्क पोलीस आयुक्त विवेक सराफ यांनी भेट दिली. वृत हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. वरील दोन्ही खुनांचा तपास पोलीस निरीक्षक राजश्री आडे व प्रशांत पोतदार यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु आहे .
दोन अपघातात दोन ठार ,एक आरोपी फरार,एक ताब्यात
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हददीत घरासमोरकाळ दुपारी १५ डिसेंबर रोजी पेपर वाचत बसलेल्या वृद्धाला भरधाव कारने धडक देत ठार केले. याप्रकरणी कारचालक फरार आहे. संतराम सखाराम भालेराव(८३) रा. हनुमान नगर गाळले नंबर ४ असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर राम रोहिदास राठोड असे आरोपीचे नाव आहे. तर दुसरा अपघात आज दुपारी अभयांत्रिकीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला जसा सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रक ने उडवले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल होणे बाकी आहे. दाखल झालेल्या अपघाताचा तपास पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बनसोडे करत आहेत