AurangabadCrimeUpdate : लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्रा, दोन शासकीय डाॅक्टरासहित चौघांना बेड्या

औरंगाबाद – गेल्या दोन आठवड्यापासुन घाटी रुग्णालयातील व वैजापूर तालुक्यातील मनुर शिवूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांना बनावट लसीचे प्रमाणपत्र वितरित करण्याच्या प्रकरणात दोन एजंटासह जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.या प्रकरणात दोन परिचारिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख रझीउद्दीन फहीमोद्दीन(२७)डाॅक्टर,शेख मोहिऊद्दीन फहीमोद्दीन(३६) धंदा डाॅक्टर, अबुबकर अल हमीद हादी, मौहम्मद मूदस्सीर मोहमद अश्पाक सर्व रा.औरंगाबाद
वरील दोन्ही डाॅक्टर सख्खे भाऊ असून ते एजंटामार्फत १हजार ते ५००रु. पर्यंत रक्कम घेऊन लस न घेताच लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र वितरित करंत होते. या गोरखधंद्याचा जिन्सी पोलिसांना सुगावा लागताच सापळा रचून चौघांना बेड्या ठोकल्या.वरील कारवाई पोलिसउपायुक्त दिपक गिर्हे, सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पीएसआय अनंत तांगडे पोलिस कर्मचारी शेख गणी, बमनात यांनी पार पाडली