AurangabadCrimeUpdate : दौलताबाद पोलिसाने १५ हजारांची लाच घेतली, एसीबीकडून अटक

औरंगाबाद – दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्याला एका खाजगी इसमासहित १५ हजार रु.ची लाच घेतांना एसीबीने आज दु.३ वा. शिंदीशिरसगाव परिसरात अटक केली.
सुरेश पोपट कवडे(५२) पोलिस कर्मचारी दौलताबाद पोलिस ठाणे व विजय सोनवणे नावाचा हाॅटेल चालक अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिस कर्मचारी कवडे वाळू वाहतूक करणार्या ट्रक मालकाला दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रक नेण्याकरता ३डिसेंबर रोजी १५हजार रु. दर आठवड्याला ५ हजार रु. मागितले होते.एकूण मागच्या दोन आठवड्याचे १५ हजार रु.लाच हाॅटेल चालकामार्फत कवडेने स्वीकारताच एसीबीने अटक केली. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संदीप राजपूत,पोलिस कर्मचारी राजेंद्र जोशी,दिगंबर पाठक, भूषण देसाई यांनी पार पाडली.