AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या लेबर कॉलनी प्रकरणाची उद्या अंतिम सुनावणी

औरंंंगाबाद : विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील घरे मालकी हक्काने मिळावीत या प्रकरणी खंडपीठात उद्या अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी दिली.
दरम्यान जिल्हाधिकारी ३१ ऑक्टोबरच्या रात्री दिलेली नोटीस मागे घ्यावी या मागणीसाठी लेबर कॉलनवासीयांनी गेल्या ९ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने कडाक्याच्या थंडीसह पाऊसही सुरू असला तरी लेबर कॉलनी बचाव संघर्ष समितीने आपले साखळी उपोषण सुरूच आहे.
विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील घरावंर ८ नोव्हेंबर रोजी बुलडोजर चालविण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेने ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लेबर कॉलनीत लावली होती. त्यामुळे हवालदिल झालेल्या लेबर कॉलनीवासीयांनी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद येथील लेबर कॉलनीची घरे स्थानिक रहिवाश्यांना मालकी हक्काने दिली. त्याच धर्तीवर आम्हालाही औरंगाबाद लेबर कॉलनी येथील घरे द्यावीत यासाठी ९ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच शासनाने वेळोवेळी जे जी.आर.(परिपत्रक) काढले आहे. त्याची अमंलबजावणी करावी अशी मागणी उपोषणकत्र्यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसापासून शहरासह जिल्हयाभरात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. तर गुरूवारी सकाळीच थंडीसह पावसाच्या धारा बरसल्या. त्यामुळे शहरवासियात हुडहुडी भरली आहे. असे असतांना देखील कडाक्याच्या थंडीत आणि पावसाच्या धारा अंगावर झेलत लेबर कॉलनी येथील नागरिकांनी आपले साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार लेबर कॉलनी बचाव संघर्ष समितीने केला आहे. दरम्यान या प्रकरणाची अंतिम सुनावणी उद्या होणार असल्याचे अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी सांगितले.