AurangabadCrimeUpdate : काॅलेजकुमाराकडे दोन गावठी कट्टे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद -शिवराई फाट्याजवळ सहा जिवंत काडतूसे आणि दोन गावठी कट्ट्यासहित काल रात्री ९.३० वा. अटक केले. रमेश चंद्रभान लवांडे(२३) रा.वैजापूर धंदा शिक्षण असे अटक आरोपीचे नाव आहे. रमेश लवांडे हा बी.ए.तृतीयवर्षात शिकत आहे. आरोपी लवांडे हा शिवराई फाट्याजवळ गावठी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती खबर्याने पीएसआय उंबरे यांना दिली.त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन इंगोले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.