अखेर सहा महिन्यांनी जफर बिल्डर पोलिसांना शरण

औरंगाबाद -कुख्यात जफर बिल्डर अखेर हायकोर्टाने जामिन नाकारल्यानंतर जिन्सी पोलिसांना सोमवारी आज शरण आला.अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
गेल्या जून मधे स्वताच्या बायकोला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जफर बिल्डरवर दाखल झाला होता.तेंव्हा पासून आरोपी जफर बिल्डर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. जिन्सी पोलिसांनीही जफर बिल्डरला जामिन मिळणार नाही अशी तयारी केली होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते जफर बिल्डर यांच्यावर सहा महिन्यांपूर्वी बायकोला आत्महत्याकरण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता तेंव्हा पासुन तो फरार होता. अखेर आरोपी जफर बिल्डर पोलिसांना आज शरण आला. दरम्यान, खंडपीठाने त्याचा जामिन नाकारला आहे. यांची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे.
३ मार्च रोजी जफर यांची पत्नी फरजाना यांनी विष प्राशन करंत आत्महत्या केली होती. २०१५ साली दोघांचा निकाह लागला होता. या घटने नंतर जफर यांचा मेव्हणा रईस अय्यूब सय्यद(४१) रा.रोशनगेट यांच्या तक्रारीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख हारुण करंत होते. दरम्यान, तेव्हा आरोपी जफर बिल्डर व नगरसेवक मतीन ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे दौघांनीही २८ जानेवारी २१ रोजी गृहमंत्री अनिल देशमुख है बैठकीसाठी शहरात आले होते तेव्हा गृहमंत्र्यांसोबंत फोटोसेशन केले होते. त्यामुळे त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आणि या प्रकरणाला राजकीय वळण आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग, झाला नाही.खंडपीठाने देखील त्याची जमीन नाकारला. शेवटी पोलिसांना शरण आल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता.
राष्र्टवादी काॅंग्रेसचे जफर बिल्डरवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा