AurangabadCrimeUpdate : किरकोळ कारणावरुन पुतण्यावर जीवघेणा हल्ला, काकूला बेड्या

औरंगाबाद : छावणीतील गवळीपुरा भागात सोमवारी रात्री १० वा. किरकोळ कारणावरुन पुतण्यावर चाकूचे वार करंत गंभीर जखमी केल्याबद्दल छावणी पोलिसांनी काकूला खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.तर काका व जखमीचा चुलंत भाऊ फरार झाले आहेत. सपना विजय कावळे असे अटक महिला आरोपीचे नाव आहे.तर सचिन कावळे असे जखमी चे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , सपना चा नवरा विजय कावळे हा दारु च्या नशेत घरी येत असतांना घराच्या अंगणात कावळे कुटुंबातील महिला जेवण करुन गप्पा मारत बसल्या होत्या त्यांच्या समोर विजयने लघुशंका केली.त्यावेळी त्याचा पुतण्या सचिन कावळे याने विजय ला जाब विचारताच विजय ने सचिनच्या कानशिलात मारली.व घरात जाऊन चाकू आणला.दरम्यान विजयची पत्नी व अल्पवयीन मुलगा धावत घराबाहेर आले व सचिन कावळे ला पकडून ठेवले.तर विजय कावळे ने अत्यंत क्रूरपध्दतीने सचिन कावळेवर जीवघेणा हल्ला करंत त्याची आतडी बाहेर काढली व मुलासह फरार झाला. वरील प्रकरणी पुढुल तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग भागिले करंत आहेत.