AurangabadCrimeUpdate : प्रेमात दगा दिल्याच्या रागातून रखेलीची हत्या, आरोपीला पोलीस कोठडी

औरंगाबाद : बायको मुलांना सोडून मजूरणीच्या नादाला लागलेल्या ड्रायव्हरने मजुरणीने दगाफटका करंत दूसरा साथीदार निवडताच तिला यमसदनी पाठवले. गुन्हेशाखेने या प्रकरणाचा सखोल तपास करंत आरोपीला बेड्या ठोकल्या.या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू दाखल होता.त्यामधे खुनाचा गुन्हा दाखल झाला.
सुनिल धोंडिराम खरात (५२) रा.जोगेश्वरी असे अटक आरोपीचे नाव आहे तर मारिया अल्हाट(४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीला कोर्टापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
या प्रकरणी गेल्या २३ सप्टेंबर रोजी मारिया बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज औद्योगिक पोलिसांकडे दाखल होती दरम्यान १ आॅक्टोबर रोजी तिचा मृतदेह पोलिसांना एकलहरा शिवारात आढळल्यानंतर या प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल झाला होता. आरोपी सुनिलला पहिल्या बायकोपासून दोन मुले आहेत.तर मारिया ही विधवा होती.तिलाही एक मुलगी व एक ७वर्षाचा मुलगा पहिल्या नवर्यापासून झालेली आहेत.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली.
अटक सुनिल खरात ने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून बायको आणि मुलांना सोडून सुनिल खरात मारियाच्या प्रेमात पडला होता. त्यांचे प्रेम वृध्दींगत झाल्यामुळे मारियाने मजूरी सोडून दिली होती त्यानंतर त्यांना ४ वर्षांपूर्वी एक मुलगाही झाला.पण काही दिवसांपूर्वी मारियाने सुनिल खरातला आपण आता बहीण भावासारखे राहू असा अजब सल्ला दिला. दरम्यान मारियाने नवा प्रियकर मिळवल्याने आरोपी खरात चांगलाच खवळला होता. याबाबत त्याने तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता मारियाने सुनिल खरात ची खिल्ली उडवली.
दरम्यान सुनिल खरातचा पहिल्या बायकोचा मुलगा व मारियाची पहिल्या नवर्यापासून झालेली मुलगी एकमेकांच्या प्रेमात पंडत पळून गेले. या प्रकरणाचीही नोंद दोन आठवड्यांपूर्वी वाळूज औद्योगिक पोलिसांकडे झालेली आहे. त्यानंतर मारियाने सुनील खरात ला ५०० रु. देत दोघांना शोधून आणण्यास सांगितले व सुनिल खरात शोधायला जाताच मारिया नव्या प्रियकराच्या घरी शिफ्ट झाली. सुनिल खरात परंत आल्यानंतर त्याला वरील प्रकार समजला आणि त्याने मारिया जवंळ एकदा शेवटची भेट मागितली. त्यामुळे मारियाही तयार झाली. भेटायला जातांना मारिया तिच्या लहान मुलाला (सुनिल खरात पासून झालेला) दवाखान्यात घेऊन गेली होती. तेथूनच ती सुनिल खरात सोबत शेवटची भेट घेण्यासाठी एकलहरा शावारातील मक्याच्या शेतात गेली. तिथे सुनिल खरात ने तिचा खून केला.
हा सर्व प्रकार खबर्या मार्फत मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाने गुन्हेशाखेच्या अधिकार्यांना सांगितला. त्यानंतर गुन्हेशाखेने सुनाल खरातला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच सुनिल खरातने खुनाची कबुली दिली. वरील कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांना सांगताच त्यांनी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले.व गुन्हेशाखेने आरोपी खरात याला वाळूज औद्योगिक पोलिसांकडे पुढील तपासासाठी सूपूर्द केले.वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता,पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव पीएसआय अमोल म्हस्के पोलिस कर्मचारी सतीश जाधव,सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, नितीन देशमुख, सुनिल बेलकर यांनी पार पाडली.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे करंत आहेत.