AurangabadCrimeUpdate : पावणेतीन लाखांचा गांजा जप्त , तिघांना अटक

औरंगाबाद -आज सकाळी ९ वा. रेल्वेस्टेशनसमोर तेलंगणातील विशाखापट्टणम येथील दोन महिला व एका पुरुषास उस्मानपुरा पोलिसांनी ३९कि.गांजासह अटक केली.ज्याची कि.२ लाख ७३ हजार रु.आहे. गोविदां मनी आरली (३८), लाऊ अम्मा राऊ आरली (४०) आणि मन्नया अप्पाराव पिल्ले (३०) सर्व रा.विशाखापट्टनम अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांना खबर्याने दिलेल्या माहितीवरुन रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधे सापळा लावून वरील कारवाई करण्यात आली. या कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे, सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बागवडे, एपीआय राहूल सूर्यतळ पोलिस कर्मचारी लांडे पाटील,अय्यूब पठाण, विश्वनाथ गंगावणे यांनी पार पाडली.