AurangabadNewsUpdate : मंदिरे उघडल्या बद्दल औरंगाबादेत भाजपच्या वतीने आनंदोत्सव

औरंगाबाद : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील मंदिरे खुली झाल्याबद्दल औरंगाबाद शहर भाजपच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला . भाजपच्या शहरात शंखनाद आंदोलनाचेच हे यश असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केले. आज घटस्थापनेच्या दिवशी गजानन महाराज मंदिरात अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर आणि परिसरात स्वच्छता करून धूप , दिवे लावून दीपोत्सव करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांकडून मंदिरात रांगोळी काढून फुलांच्या माळा, तोरणे लावण्यात आली. शेवटी आरती करून मोठ्या जयघोषात मध्ये शंखनाद करत भजन-कीर्तनावाच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंदिरामध्ये जनते सोबत दर्शन घेतले.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ,भाजप प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे , प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे , प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे ,शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, अध्यात्मिक आघाडीचे संयोजक संजय जोशी, यांनी आरती केली यावेळी सरचिटणीस राजू शिंदे, जालिंदर शेंडगे ,माधुरी अदवंत, डॉ.राम बुधवंत, दयाराम बसयै,आमृता पालोदकर, मनिषा मुंडे महेश माळवतकर, दीपक ढाकणे, मंगलमूर्ती शास्त्री ,प्रा.गोविंद केंद्रे,अजय शिंदे,लक्ष्मीकांत थेटे, मोहन आघाव, मनोज भारस्कर,राहुल नरोटे, योगेश वाणी, रवी एडके, बबन नरवडे,प्रदिप पाटील,आनंद वाघ,संजय जोरले,विवेक राठोड,शालीनी बुंधे,प्रशांत भदाणे,रामचंद्र नरोटे,संजय खनाळे,लता सरदार,राधा इंगळे,शिवाजी सांळुखे,संजय बोराडे,कुणाल मराठे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना केणेकर म्हणाले कि , भाजपच्या आंदोलनामुळेच महाविकास आघाडी सरकारला ला देवाने बुद्धी दिली. भाजपच्या वतीने महाराष्ट्र मध्ये शाळा,मंदिरे हे सुरू करण्यासाठी मागील दीड वर्षापासून पाठपुरावा चालू होता परंतु माहाविकास आघाडी सरकारने मात्र महाराष्ट्रामधील दारूचे आडे, डान्स बार, वाईन शॉप चालू केले मात्र राज्यातील धार्मिक स्थळे उघडली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राज्यभर आंदोलन केले . मागील दीड-दोन वर्षांपासून देव हा मंदिरा मध्ये कुलपा बंद केला होता, भक्तांची व देवांची असणारी श्रद्धा यामध्ये माहाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये आडकाठी आणली देव कुलूपबंद केला परंतु आता भक्तांमध्ये आनंदाची भावना आहे.