CoronaMaharashtraUpdate : अशी आहे आजची राज्याची कोरोनाची स्थिती

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ६९६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १०५ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार १६४ इतकी होती. तर, आज ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५० इतकी होती.
दरम्यान राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही थोडी कमी झाली आहे. त्याचबरोबर मृतांच्या सख्येतही घट झाली असली तरी कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या किंचित घट आहे. आज राज्यात झालेल्या ४९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७७ हजार ९५४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.
सक्रिय रुग्णसंख्येत घट
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार ९५५ इतकी आहे. काल ही संख्या ३६ हजार ३७१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ०९६ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार १५८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ७६९ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९६९ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ४१५ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९१२ आहे.
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ५८६ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६६८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७१६, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८९८ इतकी खाली आली आहे. गोंदियात १ सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४५२, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०१ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ११० वर आली आहे. तर गोंदियात राज्यात सर्वात कमी १ सक्रिय रुग्ण आहे.
दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९० लाख ७४ हजार ६६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५६ हजार ६५७ (११.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४७ हजार ००६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, १ हजार ३७० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.