AurangabadCrimeUpdate : माजी नगरसेवकाला मारहाण, अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद -जटवाडा परिसरातील माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे यांना एकतानगरच्या पालवे कुटुंबियांनी मारहाण केल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
रुपचंद वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार अशोक पालवे यांच्या गायी वाघमारेंच्या कार्यालयासमोर उभ्या राहतात व घाण करतात याबाबत वाघमारे यांनी पालवे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संतापलेल्या पालवे कुटुंबियांनी रुपछंद वाघमारे यांना मारहाण केली. या प्रकरणी अशोक पालवे, भिमराव पालवे,युवराज,धनराज, तानाबाई,संध्या, सरला या सर्व पालवे कुटुंबातील सदस्यांविरुद्ध मारहाण आणि अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल देवकर व त्यांचे पथक करत आहे.