AurangabadCrimeUpdate : साथीदाराच्या आईला पाठवला अश्लील व्हिडीओ, गुन्हा दाखल

औरंगाबाद : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने साथीदाराच्या आईला अश्लील व्हिडीओ पाठवला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आदिल चाऊस हमद चाऊस(३५) रा.चेलिपुरा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.त्याने त्याचा साथीदाराच्या आईला अश्लील व्हिडीओ पाठवला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत.
घरातील कपाटातून ९१ हजाराचे दागिने लंपास
औरंगाबाद : घरातील कपाटातून गायब झालेल्या सोन्याच्या दागिन्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात दीड महिन्यानंतर चोरीचा गुन्हा आज दाखल झाला.
नंदनवन काॅलनीतील रहिवासी प्रविण गायकवाड यांच्या घरातून गेल्या २२आॅगस्ट रोजी घरातील कपाटातून ९१ हजार रु.किमतीचे दागिने गायब झाले होते. त्यानंतर त्यांनी घरातील मोलकरीण व नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर दागिने मिळंत नसल्याचे लक्षात येताच आज २आॅक्टोबर रोजी छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड यांच्या तक्रारीनुसार गायब झालेले दागिने माहितीतल्या व्यक्तीने लंपास केल्याचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वायाळ तपास करंत आहेत.