AurangabadCrimeUpdate : फोन पे वरुन सट्टेबाजी, सहा अटक

औरंगाबाद : सिटीचौक पोलिसांनी जुनाबाजार व सातारा परिसरात आयपीएल २०२० क्रिकेटवर, कुख्यात मटकाबहाद्दरच्या निगराणी खाली फोन पे द्वारे काम करणार्या सहा सट्टेबाजांना आज पहाटे १२.१५ वा.अटक केलीत्यांच्या ताब्यातून ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भोकरदनचा कुख्यात मटका बहाद्दर जुबेर शाहा याच्या सांगण्यावरुन हा सट्टा लावण्यात आल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.
मो.यासेर.मो.याकुब,शेख आसेफ शेख रहिम,तरबेजखान करीमखान,शेख अली शेख मेहमुद, मनोज परदेशी,शेख मतीन शेख मेहमुद अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वरील आरोपी टाॅस सेशन, विनमॅच, या कोडद्वारे बेटिंग घेऊन इंडियन प्रिमिअम लिग क्रिकेट मॅचवर फोन पे च्या मदतीने सट्टा खेळतांना पकडले.मटका बहाद्दर जुबेर शाहा वरील आरोपींना टिप देत होता. वरील कारवाई पोलिस उपायुक्त उज्वला वनकर व सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी, एपीआय सय्यद,पोलिस कर्मचारी संजय नंद, संदीप तावडे,देशराज मोरे, अभिजित गायकवाड यांनी पार पाडली.