AurangabadNewsUpdate : न्यू गणेशनगरात दरोडा, वृध्द दाम्पत्याला मारहाण करत लुटले

औरंगाबाद – बीडबायपास वरील सहारा सिटी समोरील न्यू गणेशनगरात प्लाॅट (६२) राहणार्या कुटुंबाला अज्ञात तीन ते चार जणांनी आज भल्या (२९) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान मारहाण करंत लूटले.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश राधाकिसन होनमाने (३६) असे फिर्यादीचे नाव आहे. आज भल्या पहाटे ३ ते ४ जणांनी होनमाने यांच्या घराचा दरवाजा दाराच्या वरुल फटीतून हात घालून उघडला.व घरात घूसून अंदाजे २०हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.जाताना फिर्यादी प्रकाश चे हातपाय पलंगाला बांधले तर त्याचे वडिल राधाकिसन होनमाने यांना पत्नीसह मारहाण केली.
या प्रकरणी सहारा सिटी परिसरात दहशत पसरली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस करंत आहेत.