CoronaMaharashtraUpdate : सावधान : कोरोनाची आजची स्थित राज्यासाठी चिंताजनक, बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ !!

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत राज्यासाठी आज चिंताजनक बातमी असून राज्यात आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा जवळपास दुप्पट संख्येने नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला अधिक गांभीर्यांने घेण्याची गरज आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार १३० नवीनकोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २ हजार ५०६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलातर , ६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था लक्षात घेऊन राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आलेले असले, तरी देखील लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान हि वाढ अशीच होत राहिली तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा देखील सरकारकडून दिला जात आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १,३७, ७०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझटिव्हि आले आहेत. सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०१३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ अॅक्टिव्ह आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
लसीकरणात देशात महाराष्ट्राची घोडदौड
आजच्या लसीकरणाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आजपर्यंत राज्यातील ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या आधी २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्र देण्यात आल्या असून, त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.