Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढल्या

Spread the love

नवी दिल्ली : विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या. ताज्या दरवाढीनंतर, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रतिलीटर असेल.१९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही प्रति सिलेंडर ७५ रुपयांनी वाढ झाली आहे.

१ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर होती. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आजपासून ९००.५० रुपये भरावे लागतील, कालपर्यंत ७५५.५० रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला ८९७.५ रुपये भरावे लागतील.

दरम्यान आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलीटर किंमत आता १०१.३४ रुपये आणि मुंबईत १०७.३९ रुपये प्रतिलीटरआहे. दिल्लीत डिझेलची किंमत आता ८८.७७ रुपये आणि मुंबईत ९६.३३ रुपये प्रतिलीटर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!